नागपुरात भाजपाला गळती; नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह 31 पदाधिकाऱ्यांचा भाजपला रामराम
राजकारण

नागपुरात भाजपाला गळती; नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह 31 पदाधिकाऱ्यांचा भाजपला रामराम

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वाडीच्या नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. इतकेच नव्हे तर हे सर्व पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय जनता पक्षात अन्यायकारक आणि पक्षपाती कार्यप्रणाली असल्याचा आरोप करत जिल्हा भाजपचे माजी महामंत्री, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडला. अशातच वाडी नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर असताना, भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. याचा वाडीच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला गळती लागल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते संजय साडेगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा झेंडा हाती धरला. यावेळी साडेगावकर यांच्यासह जिल्ह्यातील 50 ते 55 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता.

आगामी त्यानंतर भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम तसेच भाजपा प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. इतकेच नव्हे तर भाजपाचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला होता.