मोठी बातमी ! भाजपच्या युवा महिला नेत्याला कोकीनसह अटक
राजकारण

मोठी बातमी ! भाजपच्या युवा महिला नेत्याला कोकीनसह अटक

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या युवा महिला नेत्याला कोकीनसह अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी भाजपच्या माहिला नेत्याला १०० ग्राम कोकीनसहीत अटक केली आहे. भाजपाच्या या महिला नेत्याचे नाव पामेला गोस्वामी असं आहे. पामेला गोस्वामीसोबतच तिचा सहकारी प्रबीर डे यालाही अटक करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी प्रबीरला कोलकात्यामधील अलीपुर येथील एनआर अ‍ॅव्हेन्यू येथून अटक करण्यात आलीय. पामेलाला अटक करण्यात आली तेव्हा तिच्यासोबत कारमध्ये तिचा एक सुरक्षारक्षकही होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पामेला बऱ्याच काळापासून अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा संक्षय पोलीस अधिकाऱ्यांना होता. पामेला अनेकदा एका ठिकाणी थांबायची आणि याच ठिकाणी कोकीनची तस्करी केली जायची.

पामेला मागील बऱ्याच काळापासून अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भातील कामामध्येही सहभागी होती. १९ फेब्रुवारीला पोलिसांना काही सुत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकण्यात आला. तेव्हा पामेलाकडे अमली पदार्थ सापडले. विशेष म्हणजे पामेला राजकारणामध्ये सक्रीय असल्याने तिला सुरक्षाही पुरवण्यात आलेली. जेव्हा पामेलाला अटक करण्यात आली तेव्हा तिच्यासोबत सुरक्षारक्षकही होता. अमली पदार्थांच्या सध्याच्या किंमतीनुसार जप्त करण्यात आलेले कोकीन हे पाच लाख रुपयांचे आहे. पोलीस पामेलाला आज न्यायालयासमोर हजर करणार आहे. त्यानंतर पोलीस पामेलाच्या कोठडीसाठी मागणी करणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.