पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते गंभीर जखमी
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते गंभीर जखमी

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्शभूमीवर येथील राजकीय वातावरणही ढवळून निघाले असुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची घटना समोर आली आहे. एका लग्न समारंभावरून परतत असताना काही अज्ञातांकडून बॉम्बहल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. संध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर गावात हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. जखमी भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. शोवन देबनाथ, विक्रम, अर्पण, स्वपन, महादेव अशी जखमी झालेल्यांची नावं असून यामध्ये अजून एकाचा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दरम्यान तृणमूल काँग्रेसचेच्या एका नेत्याने भाजपा कार्यकर्त्यांचे आरोप फेटाळून लावत भाजपा नेते वरुण प्रामाणिक यांनीच हा बॉम्बहल्ला केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर शुक्रवारीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. तर आज भाजपाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.