राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रकांत पाटील यांचा इशारा; म्हणाले…
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रकांत पाटील यांचा इशारा; म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वत्र सभा घेणार असतील, तर आपणही त्याच ठिकाणी जाऊन दुसऱ्या दिवशी त्यांची पोलखोल करू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. आज (ता. १६) कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशी पवार यांची प्रवृत्ती आहे. अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच, शरद पवार यांनी मराठा आरक्षण बाबत सर्वत्र फिरून जनजागृती केली जाईल. घटनादुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचा अधिकार दिला गेला. आरक्षणासाठी सरकारने पाऊल टाकले असा लोकांचा गैरसमज झाला. पण ही ओबीसींची फसवणूक आहे, अशी टीका केली होती.

यावर भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार पवार यांच्यावर हल्लबोल केला. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असताना जे मराठा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षणाबाबत काहीही करू शकले नाहीत. ते आता आपल्या चुकांचं खापर आमच्यावर फोडत आहेत. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. त्याचबरोबर, शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत राज्यातील ५ प्रमुख पक्षाच्या ५ प्रमुख नेत्यांना एकाच ठिकाणी येऊन याबाबतीत खुलासा करावा. याचे थेट प्रक्षेपण सर्व माध्यमावरून करावे. असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.