चंद्रकांत दादांचे अजित दादांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…
राजकारण

चंद्रकांत दादांचे अजित दादांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना टोला लगावला. पण चंद्रकांत पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांना अजित पवारांनी प्रतिप्रश्न केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मी कोल्हापूरला परत जाणार या वाक्याने कोणीही हुरळून जाऊ नये. घाबरूनही जाऊ नये. मी केंद्राने दिलेले मिशन पूर्ण होईपर्यंत कुठेही जाणार नाही. आयुष्यात कुठेतरी स्थिरावायचं असतं, त्या अर्थी मी गिरीश बापटांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन बोललो होतो. मी जे बोललो त्याचा संदर्भ लगेच बॅग आवरून जाण्याचा नाही. अजित पवार आता बोलू लागले आहे. त्याला आम्ही उत्तर देणार हे नक्की. कारण हा केवळ क्रिया आणि प्रतिक्रियाचा खेळ आहे.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. मुख्य म्हणजे भविष्यात शरद पवारांना एखादं मोठं पद कोणाला द्यायचा निर्णय घ्यावा लागला तर ते नक्की कोणाला देतील याचा अजित पवारांनी विचार करायला हवा, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.