मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबते सुरु; तर्कवितर्कांना उधाण
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबते सुरु; तर्कवितर्कांना उधाण

मुंबई : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि चर्चेत असलेले सचिन वझे सरकारमध्ये जोरदार खलबतं सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काल रात्री मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चा झाली. तर आज गृहमंत्री अनिल देशमुख वर्षा आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा सुरू आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर याचवेळी महाविकास आघाडी समन्वय समितीची ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर बैठक आज पार पडली. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदि उपस्थित होते. ”सचिन वाझे प्रकरणी आज बैठकीत चर्चा झाली नाही. मात्र 31 मार्च पर्यंत काय कामं प्राधान्याने करायची याबाबत आज चर्चा झाली. अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, सचिन वझे प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला चांगलाच टोला लगावला आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार पडेल किंवा सरकार अस्थिर झालं या भ्रमातून सगळ्यांना बाहेर पडावं. एका एपीआयमुळे सरकार पडणार नाही. सरकार पुढचे साडेतीन वर्ष चीतपट करणे कुणालाही जमणार नाही. या प्रकरणाचा एनआयए आणि एटीएस तपास करत आहे. केंद्रीय संस्था तपास करत असताना त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. मात्र त्यावर आमचं लक्ष आहे. कॅबिनेट बैठका सचिन वाझे प्रकरणामुळे होत नाहीयेत, सचिन वाझे प्रकरण ही लहान गोष्ट आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.