चित्रा वाघांचे अमोल मिटकरींना प्रत्युत्तर; माझं आणि साहेबांचं नातं काय…
राजकारण

चित्रा वाघांचे अमोल मिटकरींना प्रत्युत्तर; माझं आणि साहेबांचं नातं काय…

मुंबई : आपण साहेबांच्या तालमीत तयार झाला आहात त्यामुळे दिशाभूल करू नये, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपा नेत्या चित्र वाघांवर केली होती. या टीकेला आता चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. ”अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. अमोल मिटकरीला काय माहिती आहे. नवीन आमदार झालाय चांगलं काम कर. बाकी माझं आणि साहेबांचं नातं काय हे माझ्या बापाला जाऊन विचार भावा, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यानंतर चित्रा वाघ यांना तुमच्या विरोधात आणि दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांविरोधात वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्यात बंजारा समाज आणि पूजा चव्हाणची बदनामी केल्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, माझ्याकडे शेकडो मेसेज आहेत. ज्यामध्ये बंजारा समाजातील अनेकांनी पाठींबा दिल्याचे मेसेज आहेत. विविध संघटना सोबत आहेत. राजीनामा झाला म्हणजे लढाई जिंकलो नाही ही तर सुरुवात आहे. पूजाला न्याय मिळाल्याशिवाय शांत राहणार नाही. एक माणूस म्हणजे समाज नव्हे.

दरम्यान, चित्रा वाघ यांचे काही दिवसांपूर्वी काही मॉर्फ केलेले फोटो व्हायरल झाले होते. शिवाय धमक्या देणारे फोन देखील आले होते. याबाबत चित्रा वाघ यांनी आयपीसी सेक्शन 67 अंतर्गत बिकेसी येथील सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये येऊन गुन्हा दाखल केला. यावेळी माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ”आज सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. बाईला काय केल्यावर ती शांत बसेल तर तिचे खासगी फोटो, पतीसोबतचे फोटो व्हायरल करायचे. हे कशासाठी तर बलात्काऱ्याला वाचवायला? संजय राठोडशी याचा थेट संबंध आहे म्हणून त्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही लढाई लढतोय. राजीनामा ही तर खरी सुरुवात आहे पूजाच्या न्यायासाठी. माझ्यासोबत जे केलं हे तर ट्रेलर आहे. मला याचा काही फरक पडत नाही. जिजाऊंनी शिकवण दिलेली विसरलात का घरावर हल्ला करताय.”