अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक; हा विषय घातला मोदींच्या कानावर
राजकारण

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक; हा विषय घातला मोदींच्या कानावर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी आज (ता. ०८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील 12 प्रमुख विषयांवर चर्चा झाली. पण, राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्तीचा मुद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कानी घातला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आपल्याकडे राखून ठेवली असून त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या भेटीचे निमित्त साधून अजित पवार यांनी हा मुद्या सुद्धा पंतप्रधान मोदींच्या समोर मांडला.

गेल्या आठ महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारने याबद्दल यादी राज्यपालांना पाठवली आहे. राज्यात सरकार हे बहुमतात आहे. तरीही याबद्दल निर्णय घेण्यात आला नाही. हायकोर्टात सुद्धा याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारकडून यादी राज्यपालांना दिली आहे, या आमदारांची नियुक्ती कशी करायची ही कायदेशीर बाब यात पूर्ण आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज संस्थेच्या ओबीसी आरक्षण काढून टाकले आहे. त्यामुळे 56 हजार जागेवर परिणाम होत आहे. ओबीसीची जनगणना करावी. 50 टक्के ही मर्यादा काढून टाकावी, अशी मागणीही पवारांनी केली.