हास्यास्पद ! काँग्रेसने सरचिटणीस म्हणून निवडला भाजपचा नेता
राजकारण

हास्यास्पद ! काँग्रेसने सरचिटणीस म्हणून निवडला भाजपचा नेता

भोपाळ : देशात एक प्रकारे काँग्रेसचा परतीचा प्रवास चालू झाल्याचे त्यांनी केलेल्या काही कामामधूनच सातत्याने दिसत असते. आता अशीच एक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. मध्य प्रदेशात युवक काँग्रेसकडून चक्क भाजपनेत्याची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची युवक काँग्रेसने सरचिटणीसपदी निवड केली आहे. यानंतर पक्षाने तात्काळ चुक दुरुस्त केली. भाजपचे हर्षित सिंघई यांना नवी जबाबदारी मिळाल्याबद्दल अनेकांनी शुभेच्छा देणारे संदेश पाठवण्यास सुरुवात केली. हर्षित सिंघई यांना नेमकं काय सुरु आहे हेच कळत नव्हतं. कारण मार्च महिन्यातच त्यांनी ज्योदिरादित्य सिंधिया यांच्यासोबत काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण तरीही काँग्रेसच्या रेकॉर्डमध्ये मात्र हे अपडेट करण्यात आलं नव्हतं.

युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका शुक्रवारी संपल्या आणि यावेळी हर्षित सिंघल यांची १२ मतांनी निवड करण्यात आली. हास्यास्पद बाब म्हणजे कोणालाही निवडणुकीत रस नव्हता आणि माझी सरचिटणीसपदी निवड झाली. सिंधियांसोबत मी १० मार्चला पक्ष सोडला. तीन वर्षांपूर्वी मी युथ काँग्रेस निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दिला होता, असं हर्षित सिंघई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर या निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात येत होत्या.