कोरोनामुळे मिठी तर दूरच पण पत्नीचे चुंबनही घेता येत नाही; फारुख अब्दुल्ला
राजकारण

कोरोनामुळे मिठी तर दूरच पण पत्नीचे चुंबनही घेता येत नाही; फारुख अब्दुल्ला

श्रीनगर : देशभरात कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनावर परिणाम केल्याचे आपण पाहत आहोत. कोणाचा रोजगार गेला, तर कोणाचा व्यवसाय ठप्प पडला. मात्र कोरोनामुळे कोणाच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याचे अद्यापपर्यंत तरी समोर आले नव्हते. मात्र कोरोनाने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम केल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीनगरमध्ये रविवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला फारुख अब्दुल्ला यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भर कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. करोनामुळे कशा पद्दतीने आपल्या आयुष्यात बदल झाले हे सांगताना त्यांनी कोरोनामुळे आपण पत्नीला मिठी मारु शकत नाही किंवा चुंबनही घेऊ शकत नाही, असं म्हटलं. तसेच, “मी माझ्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकत नाही. कोणाला माहिती पुढे काय होणार आहे. मनात इच्छा असूनही मिठी मारण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. मी प्रामाणिकपणे हे सांगत आहे,” असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं.

जवळपास ३५ मिनिटं फारुख अब्दुल्लांचं भाषण सुरु होतं. फारुख अब्दुल्ला यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असणारे फारुख अब्दुल्ला यांनी आपण मास्क घातला नसलेले फोटो समोर आल्यानंतर मुलगी नेहमी विचारणा करते असं सांगितलं. जगात आजही अनेक लोकांचा मृत्यू होत असून लोक हात मिळवण्यास तसंच मिठी मारण्यासही घाबरतात अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. परिस्थती पुन्हा पूर्ववत व्हावी यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील त्यांनी असे हास्यास्पद विधान केले आहे. यापूर्वी 27 मार्च 2018 रोजी फारूक अब्दुल्ला यांनी काही वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना असे विधान केले होते. त्याची मुलाखत घेण्यासाठी दोन महिला पत्रकार येत असयाचे पाहून ते पळून जायला निघाले. त्यानंतर त्यांनी मस्करीत या महिलांपासून मला कोणीतरी वाचवा, असे विधान करत सर्वत्र हशा पिकवला होता.