अजान पठण स्पर्धेवरून प्रवीण दरेकारांची पांडुरंग सकपाळ यांच्यावर टीका; म्हणाले…
राजकारण

अजान पठण स्पर्धेवरून प्रवीण दरेकारांची पांडुरंग सकपाळ यांच्यावर टीका; म्हणाले…

नवी मुंबई : ”पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचं बदलतं स्वरूप सत्तेननंतर दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलणे कधी बोलले नाही. सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाली आहे. ” अशी टीका भाजपा नेता प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेता पांडुरंग सकपाळ यांच्यावर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने अजान पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. अजान मुळे मन:शांती मिळते. मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी. यासाठी या स्पर्धेचं आयोजन केल्याचं पांडुरंग सपकाळ यांनी सांगितलं आहे. ज्याप्रमाणे महाआरती होते तशीच अजान अदा केली जाते. अजानला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. असंही त्यांनी म्हटलं.

सकपाळ यांच्यावर निशाणा साधत प्रवीण दरेकर म्हणाले, “पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचं बदलतं स्वरूप सत्तेननंतर दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलणे कधी बोलले नाही तर त्यांची टीका त्यांच्या आचार विचारावर त्यांनी केलेली आहे सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते,” अशी टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

“मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठं विधान आहे. पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला नेतृत्वाला तिलंजला देणारी वाटचाल येथे सुरु आहे ह्याच हे द्योतक आहे.  बाळासाहेब ठाकरे यांनी नमाजासंदर्भात भोंगेवरुन त्यांनी घेतलेली भूमिका व त्यांनी केलेली कडवट टीका देशवासियांनी पाहिलेली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा व देशप्रेमाचा विसर सातत्याने शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर पडत चालल्याचे चित्र आहे,” असंही ते म्हणाले आहेत.