राजकारण

महिला बचत गटांना आणि पोलिसांना आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी मनसेचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करावे. तसेच बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी आज मनसेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या साथीमुळे सध्या सगळ्याच क्षेत्रांना मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशातच गेली अनेक वर्षे महिला बचत गटाद्वारे राज्यातील लाखो महिला या कष्ट करून स्वयंरोजगार निर्मिती करून स्वतःच्या पायावर कष्टाने उभ्या आहेत. मात्र कोरोनामुळे मागील 7-8 महिन्यात ही सगळी घडी विस्कळित झाली. त्यामुळे या महिला बचतगटांनी मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेले कर्ज ते वर्षानुवर्षे नियमितपणे फेडत असतांना सध्याच्या काळात या कर्जाची परतफेड ही अशक्य होतं आहे. त्यामुळे संबंधित महिलांचे कर्ज माफ करण्याचे निवेदन मनसेने अजित पवार यांना दिले आहे.

त्याचबरोबर मार्च 2019 पासून पोलीस बांधवांना मिळणारे गृहकर्ज देणे बंद झाल्याने झाले. त्यापूर्वी यात 2500 जणांना हे गृहकर्ज मंजूर होऊन देखील ते प्रत्यक्षात देण्यात आले नाही, त्यामुळे शेकडो पोलीस बांधवांची मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याप्रश्नी तातडीने पाऊले उचलून हे गृहकर्ज त्यांना मिळवून देण्याची मागणी देखील मनसेने केली आहे. तथापि, अजित पवार यांनीदेखील लगेच गृहसचिव सीताराम कुंटे यांना बोलवून घेत हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश दिले, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत