शरद पवारानंतर फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; चर्चांना उधाण
राजकारण

शरद पवारानंतर फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; चर्चांना उधाण

जळगांव : भाजपनेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी जुने सहकारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी गिरीश महाजनदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यानंतर एकनाथ खडसे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव दौऱ्यात फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फडणवीस यांनी खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान फडणवीस यांनीदेखील खडसेंच्या आरोपांना उत्तर देताना सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे अशा परिस्थितीतही फडणवीस यांनी खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.