शरद पवारांच्या राजकीय भाकिताला देवेंद्र फडणवीसांचा टोला
राजकारण

शरद पवारांच्या राजकीय भाकिताला देवेंद्र फडणवीसांचा टोला

पुणे : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणही चाग्लेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकांच्या निकालाबाबत बोलताना भाजपा संदर्भात एक भाकीत केलं आहे. “आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल. हा ट्रेंड असून, हा पाच राज्यांचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल. असं भाकीत शरद पवार यांनी केले आहे. या भाकिताला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“लोकसभा निवडणुकीपूर्वी असं भाकीत अनेक नेते करत होते की, भाजपाला केवळ १८० जागा मिळतील. पण अगोदरपेक्षा जास्त जागा भाजपाला मिळाल्या, या निवडणुकांमध्येही भाजपा हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून आपल्या समोर येईल हा मला विश्वास आहे.” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल,” असा विश्वार पवार यांनी व्यक्त केला आहे.