फडणवीसांनंतर खडसे पवारांच्या भेटीला; भेटीमागची राजकीय गणितं काय?
राजकारण

फडणवीसांनंतर खडसे पवारांच्या भेटीला; भेटीमागची राजकीय गणितं काय?

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथ खडसेंच्या घरीही फडणवीसांनी भेट दिली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान गाठले आहे. त्यामुळे एकामागोमाग होणाऱ्या या भेटीमागे नेमकी राजकीय गणितं काय आहेत? याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सोशल मिडियावर तर चर्चांना उधाण आले आहे. ३१ मे रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या ठिकाणी पोहोचले होते.

दरम्यान मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठा पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.