शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण; राहुल गांधीचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल
राजकारण

शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण; राहुल गांधीचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली : “देशाच्या सीमेवर ज्यांची मुलं आपला जीव अर्पण करतात, त्यांच्यासाठी दिल्लीच्या सीमेवर खिळे अंथरले आहेत. अन्नदाता अधिकार मागत आहे, सरकार अत्याचार करत आहे!” अशा शब्दात कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. 26 नोव्हेंबर २०२० पासून पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलक दिल्लीच्या सीमेवर वेग-वेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. केंद्राने आणलेले तीनही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय किमान आधारभूत किंमतीसंदर्भातही कायदा करण्यात यावा, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनच्या १०० व्या दिवशी आज हे शेतकरी आंदोलक काळा दिवस पाळत आहेत.

या पार्श्वभूमीवर “जे लोक धान्य पेरून धैर्याने पिकाची वाट पाहतात, महिन्यांची प्रतीक्षा आणि खराब हवामानालाही ते घाबरत नहीत! तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील!” असे ट्विट गुरुवारी राहुल यांनी केले होते. तसेच, केंद्र सरकारला कुटल्याही परिस्थितीत लागू केलेले तीनही कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असेही म्हटले होते.

त्याचबरोबर, फँटम फिल्म्स या चित्रपट निर्मिती संस्थेने केलेल्या कथित करचोरीप्रकरणी आयकर खात्याने अनुराग कश्यप, तापसी पन्नू आदींच्या मुंबई, पुण्यातील घरे व कार्यालयांवर 30 ठिकाणी बुधवारी धाडी घातल्या. यावरून, मोदी प्राप्तिकर खात्याला आपल्या इशाऱ्यांवर नाचवत आहेत. प्रसारमाध्यमांवरही मोदी सरकारचा मोठा दबाव आहे. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर केंद्र सरकार धाडी घालत आहे, असेही राहुल गांधींनी म्हटले होते.