शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन
राजकारण

शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन

मुंबई : “महाविकासाघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची भूमिका घेतली होती. हा बंद फार वेगळा आहे. हा कोणताही राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर हा बंद पाळावा,” असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी उद्या ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष इथे एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केला आहे. असेही संजय राऊत यांनी सांगितले.

“शेतकरी हा संकटातही शेतात राबतो. आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलेले असताना त्याने आपल्याला साथ दिली. आज त्याला आपली गरज असेल, तर त्याला साथ द्यावी. कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही. हा विषय देशव्यापी झाला आहे. सरकारनं दिल्लीत मागच्या 12 दिवसांपासून दडपशाही सुरु केली आहे. म्हणून स्वेच्छेन या बंदमध्ये सहभागी व्हावं,” असे आवाहन संजय राऊतांनी जनतेला केलं आहे.

“गेल्या 10-12 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर उतरून आंदोलनाला बसला आहे. 2010 ची परिस्थिती वेगळी होती. आजची वेगळी आहे. कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांना विचारा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी क्षेत्रातील तज्ञ समजले जातात,” असेही राऊतांनी सांगितले.