शेतकरी आंदोलनामुळे ज्येष्ठ नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी
राजकारण

शेतकरी आंदोलनामुळे ज्येष्ठ नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : हरयाणामधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी संसदीय सचीव असणाऱ्या रामपाल माजरा भाजपला रामराम ठोकला आहे. शेतकरी आंदोलनाला माझा पाठींबा असल्याचे माजरा यांनी जाहीर केलं आहे. माजरा यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माझं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पूर्ण समर्थन आहे. मी या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहे, असंही माजरा यांनी म्हटलं आहे. हा कायदा केवळ शेतकरीविरोधी नसून तो अंमलात आणल्यास त्याचा समाजातील इतर घटकांवरही प्रतिकूल परिणाम होईल अशी भीतीही माजरा यांनी व्यक्त केली आहे.

तीनदा आमदार राहिलेल्या माजरा यांनी इंडियन नॅशनल लोकदलला २०१९च्या विधानसभा निवडणुकीआधी सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये माजरा यांनी नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं होतं. किमान आधारभूत मूल्य भविष्यामध्ये कायम राहील की नाही यासंदर्भात माजरा यांनी शंका उपस्थित केली होती.

राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजरा यांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत जे काही झालं, जी हिंसा झाली त्याचा मी निषेध करतो. माजरा यांनी यावेळी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. हे सरकार स्वत:ला राष्ट्रवादी सरकार म्हणवून घेतं त्यांना देशाची आन बान शान असणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भातील मर्यादा कायम राखता आली नाही, अशी खंतही माजरा यांनी व्यक्त केली.