भाजपला मोठा झटका; ‘या’ पक्षाने घेतला युती तोडण्याचा निर्णय
राजकारण

भाजपला मोठा झटका; ‘या’ पक्षाने घेतला युती तोडण्याचा निर्णय

पणजी : भारतीय जनता पक्षाला एक मोठा झटका बसला असून गोवा राज्यात सत्तेत सोबत असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे गोवाविरोधी असल्याचे कारण देत जीएफपीने मंगळवारी रालोआशी फारकत घेण्याचा निर्णय जाहीर केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तत्पूर्वी, जीएफपीचे केवळ तीनच आमदार असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारच्या स्थैर्यावर कोणताही विपरीत परिणाम त्यामुळे होणार नाही. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सरकार स्थापन करताना २०१७ मध्ये जीएफपीने रालोआला पाठिंबा दिला होता. पर्रिकर यांच्या निधनानंतर जीएफपीच्या तीन मंत्र्यांना प्रमोद सावंत मंत्रिमंडळातून वगळण्यात आले तेव्हापासून आघाडीत कटुता निर्माण झाली होती.

जीएफपीच्या राज्य कार्यकारिणीची आणि राजकीय व्यवहार समितीची मंगळवारी येथे बैठक झाली, त्यानंतर जीएफपीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी, पक्षाने घेतलेल्या निर्णयाबाबतचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले आहे.