गोव्याच्या राजधानीवर भाजपचा झेंडा; महापालिकेत स्पष्ट बहुमत
राजकारण

गोव्याच्या राजधानीवर भाजपचा झेंडा; महापालिकेत स्पष्ट बहुमत

पणजी : गोव्याची राजधानी पणजी महानगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकवला आहे. गोव्यातील पणजी महानगरपालिकेसह अन्य 6 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. पणजी महानगरपालिकेमध्ये भाजपला भरघोस यश मिळवले असून 30 पैकी 25 जागा भाजप गटाने जिंकल्या आहेत तर अन्य 5 जागा काँग्रेस पुरस्कृत अपक्षांना मिळाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. एकूण 30 जागांसाठी ही मतमोजणी घेण्यात आली होती. 25 जागांवर भाजप पुरस्कृत प्रोग्रेस फॉर टूगेदर या पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. बहुमतासाठी लागणारा 16 जागांचा जादुई आकडा भाजपने गाठला आहे.

गोव्यातील पणजी महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे पुरस्कृत केवळ 5 जण निवडून आले. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपने जोरदार आघाडी घेतली होती. अखेर ही आघाडी आता विजयामध्ये रुपांतरीत झाली आहे.