भाषण सुरु असतानाच मुख्यमंत्री कोसळले स्टेजवर
राजकारण

भाषण सुरु असतानाच मुख्यमंत्री कोसळले स्टेजवर

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी भाषण सुरु असतानाच स्टेजवल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. एका कार्यक्रमात त्यांचं भाषण सुरु असतानाच अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना सरकारी विमानातून अहमदाबादला नेण्यात आलं आहे. ६४ वर्षीय विजय रुपानी २०१६ पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विजय रुपानी यांची प्रकृती सध्या स्थिर असून ब्लड प्रेशर कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विजय रुपानी यांना अहमदाबादमधील युएन मेहता रुग्णालयात नेलं जाणार असून तिथे पूर्वकाळजी म्हणून त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विजय रुपानी वडोदरा येथील नझीमपुरा परिसरात आयोजित रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याचवेळी हा सगळा प्रकार घडला.

दरम्यान, विजय रुपानी यांनी वडोदरा येथील आपल्या भाषणादरम्यान आपलं सरकार गुजरातमध्ये धर्मांतराला रोखणारा कायदा आणणार असल्याचं आश्वासन दिलं. यावेळी ते म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने आपली सर्व आश्वासनं पूर्ण केली आहेत. गुजरातच्या विकासाच्या आपण शिखरावर आहोत. गुजरातची प्रतिमा वाढवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.