पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू; भाजपा नेत्याचा पोलीस अधिकाऱ्याला धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल
राजकारण

पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू; भाजपा नेत्याचा पोलीस अधिकाऱ्याला धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल

जालना : गेल्या काही काळापासून नेतेमंडळी पोलीस अधिकारी आणि अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भाजप नेता बबनराव लोणीकर यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू; अशी धमकी दिल्याचं या कथित ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कोर्टाच्या आदेशाशिवाय व्यापाऱ्यांच्या घरात घुसता कसे? असा सवाल आयपीएस अधिकाऱ्यांना विचारात आहेत. या प्रश्नावर उत्तर देत अधिकारी म्हणाले की, मिळालेल्या माहितीनंतरच धाड टाकली होती, पण त्यामध्ये काहीच आक्षेपार्ह्य सापडलं नाही तथापि, पोलीस अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर बबनराव लोणीकर संतापले आणि त्यांनी विधानसभेत तुम्हाला उलटं टांगील सगळ्यांना अशी धमकी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची माहिती एका यपीएस अधिकारी हसन गौहर यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकासह हसन गौहर यांनी त्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. मात्र त्यांना छापेमारीत काहीच आढळून आलं नाही. त्यानंतर त्या संबधित व्यापाऱ्याने घडलेला सर्व प्रकार बबनराव लोणीकरांना सांगितला. त्यानंतर लोणीकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून धमकावल्याचा प्रकार समोर आली आहे.