लष्कराची गुपिते बाहेर  येतातच कशी?; संजय राऊतांचा अर्णब गोस्वामीला सवाल
राजकारण

लष्कराची गुपिते बाहेर येतातच कशी?; संजय राऊतांचा अर्णब गोस्वामीला सवाल

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविषयी माध्यमां मध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना खासदर संजय राऊत यांनी अर्णब गोस्वमींवर निशाणा साधला साधत लष्कराची गुपिते बाहेर येतातच कशी, असा सवाल केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”देशावर पुलवामा हल्ला होणार आहे हे आधीच अर्णब गोस्वामींना माहित होत, याचा अर्थ लष्कराची गुपितं सुरक्षित नसल्याचं सांगत ही गुपितं बाहेर येतातच कशी असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय. राष्ट्रीय गुपितं, लष्कराची गुपितं जर बाहेर येत असतील तर तो देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका असल्यांच मत खासदार संजय राऊत यांनी केलंय. या प्रकरणी देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी आपली भूमिका मांडावी अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. पार्थ दासगुप्ता हे टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सैन्यातील रहस्ये माहिती नसतात. कोणाकडे अशी माहिती असल्यास त्याचे सरळ कोर्ट मार्शल केले जाते. याचाच अस्र्थ असा की, राष्ट्रीय गुपिते सुरक्षित नाहीत आणि ती सार्वजनिक झाली आहेत. ”

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यात झालेल्या चॅटमध्ये पार्थ दासगुप्ता यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना निष्क्रीय असल्याचे वर्णन केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संभाषणात सर्व मंत्री त्यांच्यासोबत असल्याचेही समजते, अशी माहिती अर्णब गोस्वामी यांनी दिली. याशिवाय फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत एक आक्षेपार्ह विधानही सापडले आहे.