त्यांना जिवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन; मुख्यमंत्र्यांचा माफियांना इशारा
राजकारण

त्यांना जिवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन; मुख्यमंत्र्यांचा माफियांना इशारा

भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या चौथ्या कार्यकाळात चौहान यांची कार्यपद्धती बरीच बदलली आहे. राज्यातील माफियांविरोधात कडक पावलं उचलण्यास त्यांनी सुरुवात केली असून यासंदर्भात ते वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत. असाच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांनी थेट गुंडगिरी आणि दादागिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भोपाळमधील होशांगबाद येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्यांनी माफिया लोकांना थेट धमकीच दिली आहे. एएनआयने हा व्हिडिओ ट्विट केला असून त्यात त्यांनी आक्रमकता दिसून येत आहे. “मध्य प्रदेश सोडा अन्यथा जमिनीत गाडून टाकेन, अन् कोणाला पत्ताही लागणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी काही लोकांना गंभीर इशारा दिला.

तसेच, “मी सध्या खतरनाक मूडमध्ये आहे. जे लोक चुकीचं काम करतात त्यांना मी सोडणार नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी मध्यप्रदेश सोडावं अन्यथा मी त्यांना जीवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन आणि कोणाला पत्ताही लागणार नाही.” असंही त्यांनी म्हंटल आहे.

ते पुढे म्हणाले की, “सुशासनात मध्य प्रदेशमध्ये गुंड, दादागिरी करणाऱ्या लोकांना सहन केलं जाणार नाही. सर्व गुंडांना तुडवून त्यांचे हात-पाय-कंबर मोडून उद्ध्वस्त करण्यात येईल. जनतेसाठी फुलाप्रमाणे कोमल तर दुष्टांसाठी शस्त्रापेक्षाही कठोर असं आमचं सरकार आहे.”