मैं देश झुकने नहीं दूँगा… ‘त्या’ वचनाची आठवण करून देत राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टीकास्त्र
राजकारण

मैं देश झुकने नहीं दूँगा… ‘त्या’ वचनाची आठवण करून देत राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. अनेकदा भारताने चीनच्या कारवाया उधळून्ही लावल्या आहेत. मात्र, सॅटेलाइटच्या माध्यमातून चीननं भारतीय हद्दीत गाव वसवल्याची माहिती समोर आल्याने पुहा एकदा खळबळ माजली आहे. आता या मुद्द्यावरून केंद्रातील विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारला निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या विधानांचं स्मरण करून देत हल्लाबोल केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चीननं अरुणाचलमध्ये गाव वसल्याच्या वृत्ताचा फोटो ट्विट करत “मैं देश झुकने नहीं दूँगा, हे त्यांचं वचन आठवतंय का?,” असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे. चीननं ओलांडून ४.५ किमी भारतीय हद्दीत घुसखोरी करून हे गाव वसवलं असून, या गावात घरंही बांधल्याचं दिसत आहे. सॅटेलाईट फोटोतून दिसून आलेल्या दृश्यात चीननं अरुणाचलमध्ये हे गाव वसवलं असून, हे फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजी आहेत. सरकारी नकाशानुसार हा भाग भारतीय हद्दीत येतो, मात्र, १९५९ पासून त्यावर चीननं कब्जा मिळवलेला आहे. पूर्वी इथे फक्त चिनी सैन्याची चौकी होती. मात्र, नव्या छायाचित्रात इथे गाव वसवण्यात आल्याचं दिसत आहे.

तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री किरण रीजुजू यांनी राहुल गांधी यांच्या या टीकेवर पलटवार केला आहे. ” दुसऱ्या व्यक्तीला दोष देण्याआधी कधी कधी स्वतःकडे पाहत जा. ज्या ठिकाणी चीनने गाव वसवले त्या ठिकाणी चीनने कॉंग्रेस सरकारच्या काळातच कब्जा करण्यास सुरवात केली आहे. एक राष्ट्रीय स्तरावरील नेता ही बाब कशी विसरू शकतो.

तसेच, अरुणाचल प्रदेश चे भाजपा भाजपाचे खासदार तपीर गाओ यांनीही असा दावा केला होता. ते म्हणाले की, 80 च्या दशकापासून या ठिकाणी चीनी सैन्याचे कब्जा केला आहे. त्यावेळी याठिकाणी चीनी सैन्याने गाव वसविण्यास आणि आता रस्ते बांधायला सुरवात आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशच्या भूमीवर चीनमध्ये गाव बांधण्याच्या बातम्या नवीन नाहीत.