शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील
राजकारण

शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील

पुणे : ”केंद्र सरकारची ही दडपशाही योग्य नसून आणीबाणीच्या वेळी जसा जनउद्रेक झाला तसा आता शेतकऱ्यांचा होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंद ची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ”कृषी कायदे (विधेयके) यांना शेतकऱ्यांचा विरोध का आहे हे समजून घेण्याऐवजी केंद्र सरकार या विरोधातील आंदोलनाला जातीय व प्रांतीय रंग देत आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद असल्याने देशातील शेतकरी दिल्लीपर्यंत जाऊ शकले नाहीत,तर जे शेतकरी स्वत:च्या गाड्यांनी गेले त्याला जागोजागी अडवून दडशाहीचा वापर करून पुन्हा पाठविण्यात आले. मात्र केंद्र सरकारची ही दडपशाही योग्य नसून आणीबाणीच्यावेळी जसा जनउद्रेक झाला तसा आता शेतकऱ्यांचा होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील.

दरम्यान, अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंद ची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ”केंद्र शासनाने लागू केलेले तीन कृषीविषयक कायदे म्हणजे अदानी-अंबानी अशा खाजगी उद्योजकांना पायघड्याच आहेत. असा आरोप केला आहे. तसेच शेतमाल उत्पादकापासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांनाच हे कायदे घातक असून, याविरोधात ८ डिसेंबर भारत बंद आंदोलनात बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवस तरी सर्व घटकांनी आपले व्यवहार बंद ठेवावेत; असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तसेच, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केंद्र सरकारने समजूतदारपणाची भूमिका घेतली पाहिजे. पण शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून त्यांच्यावर लाठीहल्ला करणे, महामार्ग खोदून दिल्लीच्या सीमेवर रोखणे हे सरकारचे कृत्य परिस्थिती चिघळविण्यास कारणीभूत ठरवेल असेही शेट्टी म्हणाले.

देशभरात मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी भारत बंद ची घोषणा केली आहे. या भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडीसह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्या भारत बंद पुकारला आहे. त्याचबरोबर ९ डिसेंबर रोजी सरकार पुन्हा शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे.