पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; भाजपा नेत्याची राज्यपालांकडे  मागणी
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; भाजपा नेत्याची राज्यपालांकडे मागणी

पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपा नेते आक्रमक झाले असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नेतेही ममता बॅनर्जी सरकारवर टीका करत आहे. याप्रकरणी भाजपा आमदार राम कदम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राम कदम यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावेळी राम कदम यांच्या सोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते. “पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला चाललो आहोत. आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी,” असं राम कदम यांनी ट्विट करत म्हटलं होतं.

त्यापूर्वी, आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात काळे झेंडे दाखवून ममता बॅनर्जी सरकारचा निषेधकरत आंदोलन करण्यात आलं. यावेळी ममता हटाव बंगाल बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. पश्चिम बंगालमधील नागरिकांना घेऊन राम कदम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. राज्यपालांना भेटून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी राम कदम यांच्या सोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते.

तर दुसरीकडे, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फटकारलं आहे. “पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था गेल्या अनेक काळापासून खालावत चालली आहे. परिस्थिती चिंताजनक पातळीवर आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनात्मक बांधील आहेत. त्यांना घटनेचं पालन करावंच लागेल,” असं राज्यपालांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेसाठी ममता बॅनर्जी सरकारला जबाबदार ठरवलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांनी बाहेरचे उल्लेख करत भाजपासंबंधी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “भारतीयांबद्दल बाहरेचे म्हणून बोलत आहेत का ? मुख्यमंत्री मॅडम आगीशी खेळू नका”. असा इशाराही त्यांनी दिला आहे.