विश्वास नांगरे पाटीलांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण
राजकारण

विश्वास नांगरे पाटीलांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सिल्व्हर ओक या ठिकाणी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुर झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली आहे. नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची राज्यातील डेलकर, मनसुख हिरेन आणि वाझे प्रकरणावर भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी याच्या घराबाहेर स्फोटके भरलेली कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणावर देखील दोघांची चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नांगरे पाटील हे पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटले. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते.

या भेटीत पवार यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चर्चा केली असावी असेही बोलले जात आहे. शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मोहन डेलकर आत्महत्या, प्रकरणांवरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. विधानसभेत याचे पडसाद उमटले आणि मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आले आहे.