एकनाथ खडसेंना वाढदिवसनिमीत्त जयंत पाटलांकडून जबरदस्त गिफ्ट
राजकारण

एकनाथ खडसेंना वाढदिवसनिमीत्त जयंत पाटलांकडून जबरदस्त गिफ्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना वाढदिवसानिमीत्त जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसोचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिले आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील ५२ गावांना फायदा होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या कार्यक्रमाला व्हर्च्युअल माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सहभागी झाले होते. वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेत, हातनूर धरणातून पावसाचे वाहून जाणारे पाणी लिफ्ट करून ओझरखेड धरणात पाठवले जाईल व या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच औष्णिक विद्युत केंद्रासाठी केला जाणार आहे. आज ओझरखेड धरणात पाणी सोडत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, रोहिणी खडसे व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.