आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलप्रकरणी भाजप सचिवाचा राजीनामा
राजकारण

आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलप्रकरणी भाजप सचिवाचा राजीनामा

चेन्नई : तामिळनाडूमधील भाजप सचिव के. टी राघवन यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राघवन यांनी महिलांसोबत चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असून हा व्हिडीओ भाजपच्या सदस्यांनीच जारी केला होता. पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांबरोबर शर्टलेस होऊन व्हिडीओ चॅट करताना दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मदन रविचंद्रन यांनी मंगळवारी सकाळी हा व्हिडिओ अपलोड केला असून राघवन यांचे असे जवळपास १५ व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याचं म्हटलं आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष के अन्नामलई यांच्याशी सल्लामसलत करून हा व्हिडिओ रिलीज करण्याचा निर्णय घेतला. पीडितेला न्याय मिळवून देण्यास व्हिडिओ रिलीज करण्यास अन्नामलई यांनी सांगितल्याचा दावा रविचंद्रन यांनी केला होता.

व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेच राघवन यांनी राजीनामा दिला आहे. मी गेल्या तीन दशकांपासून पक्षासाठी निस्वार्थपणे काम करतोय. हा व्हिडिओ माझी आणि पक्षाची प्रतीमा मलिन करण्यासाठी व्हायरल करण्यात आला आहे, असं म्हणत राघवन यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.