कन्हैय्या कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
राजकारण

कन्हैय्या कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. २८ सप्टेंबर रोजी तो पक्षप्रवेश करणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे त्याने पक्षात प्रवेश केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आता ह्या अफवांना पूर्णविराम लागला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य असलेला कन्हैया कुमार हा त्याच्या भडक भाषणांसाठी, विशेषत: जेएनयूच्या दिवसातील भाषणांसाठी ओळखला जातो. त्याने बेगूसराय मतदारसंघातून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांच्या विरोधात उभा राहिला.

कन्हैया कुमार निवडणुकीत गिरीराज सिंह यांच्याकडून पराभूत झाला आणि आता पुढील बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात सामील होणार आहे. इंडिया टुडेने याविषयीचे सविस्तर वृत्त दिलं आहे.