कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार पदावरून पायउतार?
राजकारण

कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार पदावरून पायउतार?

नवी दिल्ली : कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत धूसफूस सुरु असून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या जागी कोण असेल? याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. मात्र अद्याप त्यावर अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, असे संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि खणन मंत्री एमआर निरानी यांचं नाव आघाडीवर आहे. नेतृत्व बदलावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आज संध्याकाळपर्यंत याबाबत सर्व चित्र स्पष्ट होईल. मी पक्षश्रेष्ठींकडून नावाची आशा करतो. तुम्हाला लवकरच याबाबत माहिती मिळेल. दलित मुख्यमंत्री नियुक्तीबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे. मला कोणतीच चिंता नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत.

भाजप पक्षश्रेष्ठींनी याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही. २६ जुलै येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा शेवटचा दिवस असेल असं बोललं जात आहे. कर्नाटकच्या राजकारणात येडियुरप्पा यांचं वलय आहे. येडियुरप्पा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिकारीपुरातील पुरसभा अध्यक्षापासून केली होती. १९८३ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. आठवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चौथा कार्यकाळ आहे.