काँग्रेस आमदाराने भर विधानसभेत काढला शर्ट!
राजकारण

काँग्रेस आमदाराने भर विधानसभेत काढला शर्ट!

नवी दिल्ली : कर्नाटकच्या विधानसभेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या मागण्यांसाठी काँग्रेस आमदारांने कर्नाटक विधानसभेच्या व्हेलमध्ये येत त्यांनी चक्क शर्टच काढला! त्याची शिक्षा म्हणून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना ७ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. द न्यूज मिनटनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कर्नाटकच्या विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसचे भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी इतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत व्हेलमध्ये आले. घोषणाबाजी करता करता संगमेश यांनी अचानक त्यांचा शर्ट काढला.

हा प्रकार पाहून विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कगेरी यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या आमदारांना नियंत्रणात ठेवण्याची विनंती केली. मात्र, संगमेश कुणाचंही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेर, अध्यक्षांनी त्यांना ७ दिवसांसाठी निलंबित केल्याचं जाहीर केलं. आपण कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करत नव्हतो तर फक्त न्यायाची मागणी करत होतो, अशी प्रतिक्रिया नंतर संगमेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.