मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केली ‘या’ प्रमुख ८ मुद्द्यांवर चर्चा
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केली ‘या’ प्रमुख ८ मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील काही प्रश्नासंदर्भात आज (ता. ०८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झालेले महत्वाचे मुद्दे
१) मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

२) काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय राजकारणातील आरक्षणाचा मुद्यावर चर्चा केली आहे. हा देशभरात गावपातळीवर महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन मोदींनी दिले.

३) मुंबईतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी हीच जागा योग्य असून ती द्यावी, अशी मागणीही केली.

४) जीएसटीचा परतावा मिळावा यासाठी मागणी केली

५) पिक विमामध्ये काही अटी शर्थी आहे, त्याबद्दल चर्चा केली आहे. बीड पॅटर्न सर्वात जास्त चर्चेत राहिला आहे, त्याबद्दल कल्पना दिलीय

६) राज्यावर नेहमी निसर्ग चक्रीवादळ आणि तौक्ते चक्रीवादळ धडकून गेले. त्यामुळे नुकसान झाले. जी काही मदत दिली जाते त्याचे एनडीआरएफचे निकष बदलण्यात यावे. मागे आम्ही निकष बदलून मदत दिली. त्यात कायम स्वरूपी बदल करावे.

७) १४ व्या वित्त आयोगानुसार थकीत निधी देण्यात यावी अशी मागणी केली

८) मराठी भाषा दिनाला फक्त अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी वारंवार मागणी झाली. पण, मराठी भाषेला दर्जा द्यावा अशी मागणी आहे.