राजकारण

पंतप्रधान मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील : मुख्यमंत्री

नवी दिल्ली : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. ०८) पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समिती उपप्रमुख अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, पदोन्नतील आरक्षण, जीएसटी परतावा, कांजूरमार्ग इथल्या मेट्रो कारशेडसाठी जागेची उपलब्धता, पीक विमा, तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीचे निकष बदलणे अशा विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याबाबतही पंतप्रधानांशी झालेल्या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *