सध्या मी बेरोजगारच, पंकजांच्या कानपिचक्या, शेवटी म्हणाल्या, एक तीर में दो शिकार
राजकारण

सध्या मी बेरोजगारच, पंकजांच्या कानपिचक्या, शेवटी म्हणाल्या, एक तीर में दो शिकार

बीड : सध्या मी बेरोजगारच आहे, असं म्हणत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा एकदा कानपिचक्या लगावल्या आहेत. बीडमधील परळी येथे एका कार्यक्रमात पंकजांनी उपस्थितांना संबोधित करताना हे वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरी ते मला संपवू शकणार नाहीत, असं वक्तव्य केल्याने नुकत्याच पंकजा चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर स्वतःला ‘बेरोजगार’ म्हणवून पंकजांनी एकप्रकारे भाजप नेत्यांनाच शालजोडीत लगावल्याची चर्चा आहे. भगवानगडावर होणाऱ्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याकडेही समर्थकांचं लक्ष लागलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं, तर ताईंना सांग मला काही तरी काम द्या, याचा मला खूप आनंद झाला, कारण मी जर कोणाला काम देऊ शकत असेन, तर मलाही काम मिळेल, सध्या मी बेरोजगारच आहे, मला तुमची आवडली प्रार्थना, एक तीर मे दो शिकार, असं म्हणत पंकजांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना चिमटे काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा मोहत्सवात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. अस म्हणत त्यांच्या वादग्रस्त वक्त्यावरून झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केले.

जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे..हे युद्ध सोशल मीडिया वर लढले जाते असे पंकजा मुंडे म्हणाल्यात. सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडूनच पराभवाचा फटका बसला होता. त्यानंतर दोन वेळा झालेल्या विधानपरिषद निवडणुका, तसंच राज्यसभा निवडणूक यातही पक्षाने पंकजांना उमेदवारी न देता डावललं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. अगदी पंकजा टोकाचा निर्णय घेणार असल्यापर्यंतही अफवा उठल्या होत्या.

सध्या पंकजा मुंडेंकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी आहे. तसंच त्यांची मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु त्यांच्याकडे तूर्तास कोणतेही संसदीय पद नाही.