बाळासाहेब थोरात सोडणार प्रदेशाध्यक्षपद; प्रदेशाध्यपदासाठी ‘या’ नावांची चर्चा
राजकारण

बाळासाहेब थोरात सोडणार प्रदेशाध्यक्षपद; प्रदेशाध्यपदासाठी ‘या’ नावांची चर्चा

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती काँग्रेसममधील काही नेत्यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर या पदासाठी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना पटोले, विजय वड्डेटीवार, संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत आहेत. जून २०१९ मध्ये बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. सरकारमधील जबाबदारी आणि पक्षातील इतर जबाबदारी असल्याने आणि नवीन चेहर्‍याला संधी मिळावी म्हणून प्रदेशाध्यक्ष सोडण्याची इच्छा बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसमध्ये पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्याकडे दोन पदे आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे विधीमंडळ पक्ष नेते अशी दोन पदं थोरात सांभाळत आहेत. दोन स्तरावर काम करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. त्यातच महाराष्ट्रतील काही नेते सतत दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलावा यासाठी हायकामंडकडे लॉबिंग करत होते. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.