ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा

मुंबई : राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ”ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना ८० टक्के जागा मिळाल्याच्या दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबतही थोरात यांनी समाधान व्यक्त करताना म्हंटले आहे की, ” काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने खूप चांगली कामगिरी केली आहे.गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामावर जनतेने या निकालांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना संपूर्ण राज्यात मिळून ८० टक्के जागा मिळताना दिसत आहेत. जनता आमच्या कामावर समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

याच बरोबर, या निवडणुकीत राज्यभरात मिळून काँग्रेसला चार ते साडेचार हजार ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळेल असा दावाही बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. मात्र, या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाची मोठी पीछेहाट झाली आहे. भाजपाची पीछेहाट हेच या ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. स्वत: चंद्रकांत पाटील हे स्वत:च्या गावाच ग्रामपंचायत राखू शकले नाहीत, असे म्हणत या निवडणुकीच्या निकालांवरून बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला टोलाही लगावला आहे.