विधान परिषद निवडणुकीचे निकाल हाती आले; पाहा कोणी कुठे मारली बाजी?
राजकारण

विधान परिषद निवडणुकीचे निकाल हाती आले; पाहा कोणी कुठे मारली बाजी?

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ अशा सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास निश्चित झाले आहेत. त्यापैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुढे आहेत. तर धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अमरीश पटेल विजयी झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या या पहिल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल यांचा विजय होताच काल (ता. ०३) भाजप नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला होता. पटेल यांनी ३३२ मते मिळवीत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना अवघी ९८ मते मिळाली होती.

अन्य मतदारसंघातील मतमोजणीचे चित्र

धुळे-नंदुरबार स्था. स्वराज्य
अमरीश पटेल (भाजप) ३३२ (विजयी)
अभिजित पाटील (कॉंग्रेस) ९८

अमरावती शिक्षक मतदारसंघ
किरण सरनाईक (अपक्ष) ६०८८ (विजय निश्चित)
श्रीकांत देशपांडे (शिवसेना) ५१२२

पुणे शिक्षक मतदारसंघ
जयंत आसगावकर (कॉंग्रेस) (विजय निश्चित)
दत्तात्रय सावंत (अपक्ष)

पुणे पदवीधर
अरुण लाड (राष्ट्रवादी) (विजय निश्चित)
संग्राम देशमुख (भाजप)

औरंगाबाद पदवीधर
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) २७२५० (विजय निश्चित)
शिरीष बोराळकर (भाजप) ११२७२

नागपूर पदवीधर
ॲड. अभिजित वंजारी (कॉंग्रेस) २४११४ (विजय निश्चित)
संदीप जोशी (भाजप) १६८५२