ठरलं ! काँग्रेस या नेत्याला देणार राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद!
राजकारण

ठरलं ! काँग्रेस या नेत्याला देणार राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद!

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता राज्यसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. गुलाम नबी आझाद यांच्याजागी मल्ल्किार्जुन खर्गे यांची वर्णी लागू शकते. काँग्रेसमध्ये तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. मल्ल्किार्जुन खर्गे यांच्याकडे राज्यसभेचे विरोधीपक्ष नेतेपद येऊ शकते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ द्यायचा कोणताही निर्णय काँग्रेसने घेतला नाही. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या काही नेत्यांनी हायकमांडला पत्र लिहित काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद यांचाही समावेश होता. या पत्राचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले होते. काँग्रेसच्या बैठकीत असं पत्र लिहिण्यावरून वाद झाल्याचंही बोललं गेलं. काँग्रेसमधल्या या लेटर बॉम्बमुळे आझाद यांना पुन्हा राज्यसभेचं तिकीट मिळणार नसल्याच्या चर्चाही झाल्या होत्या.

गुलाम नबी आझाद राज्यसभेतून गेल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावर मल्लिकार्जुन खर्गेंचा पर्याय काँग्रेसने जवळपास निश्चित केला आहे.