पुण्यातील माजी आमदारांनी मोदींना बांधली राखी
राजकारण

पुण्यातील माजी आमदारांनी मोदींना बांधली राखी

पुणे : कोथरुडच्या माजी आमदार आणि भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना राखीदेखिल बांधली आहे. या भेटीसंदर्भात मेधा कुलकर्णी यांनीच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये मेधा यांनी मोदींना राखी बांधतानाचे तीन फोटो पोस्ट करत त्याला, अलौकिक, अद्वितीय व्यक्तिमत्वाची अविस्मरणीय भेट, अशी कॅप्शन दिली आहे. ही भेट पंतप्रधान निवासस्थान म्हणजेच ७ लोक कल्याण मार्ग येथील प्रशासकीय निवासस्थानी झाल्याचं मेधा यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एक रकमी ५ लाख रुपये अथवा दरमहा ५ हजार वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी अशी विनंती मी पंतप्रधानांकडे केली, असं ट्विट मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे. अनेक महिलांना कोरोनामुळे पती गमावावा लागला, त्यामुळे त्यांचा आधार कायमचा गेला आहे. अशा स्थितीमध्ये त्यांच्यावर मुलाबाळांसह संसार चालवण्याची जबाबदारी आली आहे. असं असताना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी कोणतीही मदत न केल्याबद्दलची नाराजीही मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केली.

तसेच अशा गरजू महिलांना मदत करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना तयार करण्याची गरज आहे असं मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिलं. अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी, या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखील मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.