राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने मनसे आक्रमक; ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही, तर…
राजकारण

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने मनसे आक्रमक; ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही, तर…

मुंबई : अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी मनसे गेल्या काही दिवसांपासून करत आहे. या प्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाला भेट देत आपली मागणी मांडली होती. मात्र, या प्रकरणी अ‍ॅमेझॉन कोर्टात गेले आहे.दिंडोशी न्यायालयाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आणि मनसे सचिवांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये राज ठाकरेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध अ‍ॅमेझॉन हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अ‍ॅमेझॉनवरमराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने सुरु केलेल्या मोहिमने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मात्र या प्रकरणी अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली होती. तर दुसरीकडे, राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने यांची मोठी किंमत ॲमेझॉनला मोजावी लागणार आहे. आम्हीही त्यांना नक्कीच कायदेशीर उत्तर देऊ, असं अखित्र चित्रे यांनी सांगितले. तसेच ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही. मग आम्हालाही महाराष्ट्रात ॲमेझॉन मान्य नाही. तसेच ॲमेझॉन लवकरात लवकर वठणीवर आलं नाही, तर त्यांचा व्यावसाय महाराष्ट्रात पूर्णपणे ठप्प होईल, असा इशाराही मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी मनसे गेल्या काही दिवसांपासून करत आहे. या प्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाला भेट देत आपली मागणी मांडली होती. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी मनसेच्या या मागणीची दखल घेतली होती. तसेच मराठीच्या वापराबद्दल सकारात्मक असल्याचं त्यांनी मेलद्वारे मनसेला कळवलं होतं. यासाठी अ‍ॅमेझॉनचं एक शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं. मात्र दोन महिन्यानंतर मराठीच्या वापराबाबत कोणतंही पाऊल अ‍ॅमेझॉनकडून उचललं न गेल्यामुळे मनसेचे आता अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.