जिल्हा परिषद पोटनिवडणूक : भाजपच्या होमपिचवर काँग्रेसचा जोरदार विजय
राजकारण

जिल्हा परिषद पोटनिवडणूक : भाजपच्या होमपिचवर काँग्रेसचा जोरदार विजय

नागपूर : नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. नागपूरमधील १६ जागांपैकी काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवत ग्रामीण नागपूरवर आपला दबदबा दाखवून दिला आहे. यानंतर ३ जागांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर २ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नागपूरमधील दवलामोटी गणाच्या मतमोजणीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अवघ्या १० मिनिटात आधी घोषित निकाल बदलल्याचं दिसलं. दवलामोटी मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना आधी भाजपच्या ममता जैस्वाल यांच्या विजयाची बातमी आली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, हा आनंद केवळ १० मिनिटांचा ठरला. त्यानंतर लगेचच मतांची पुन्हा मोजणी झाली आणि काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांनी १० मतांनी विजय मिळवला.

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार
१. केळवद – सुमित्रा कुंभारे – काँग्रेस
२. वाकोडी – ज्योती सिरसकर – काँग्रेस
३. राजोला – अरुण हटवार – काँग्रेस
४. गुमथाळा – दिनेश ढोल – काँग्रेस
५. वदोडा – अवंतीका लेकुरवाळे – काँग्रेस
६. आरोली – योगेश देशमुख – काँग्रेस
७. करंभाड – अर्चना भोयर – काँग्रेस
८. निलडोह – संजय जगताप – काँग्रेस
९. गोधणी (रेल्वे) – कुंदा राऊत – काँग्रेस
१०. येनवा – समीर उमप – शेकाप
११. डिगडोह – रश्मी कोटगुले – राष्ट्रवादी
१२. भिष्णुर – प्रवीण जोध – राष्ट्रवादी
१३. बोथीय पालोर – हरिष उईके – गोंडवाना
१४. पारडशिंगा – मीनाक्षी सरोदे – भाजप
१५. सावरगाव – पर्वता काळबांडे – भाजप
१६. डिगडोह-इससानी – अर्चना गिरी – भाजप