मी तुमचा चाहता’ म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र
राजकारण

मी तुमचा चाहता’ म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र

मुंबई : कोरोनाने गेल्या वर्षभरात मोठे नुकसान केले असताना मास्क आवश्यक असल्याचं सरकार वारंवार सांगत असून देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आतापर्यंत मास्क लावलेला नाही. राज ठाकरे यांनी मास्क लावावा म्हणून राष्ट्रवादीते नेते क्लाईड कास्टो यांनी पत्र लिहिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

क्लाईड कास्टो पत्रात म्हणाले, ‘मी तुमचा चाहता आणि प्रशंसक आहे. हे खुले पत्र मी राजकीय पक्षातील संबंधित व्यक्ती म्हणून नव्हे, तर माझ्यासह तुमच्या अवती -भोवती वावरणाऱ्या सर्वसामान्यांची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून लिहित आहे. ‘ असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना बाहेर असताना मास्क घालण्याची विनंती केली.

दरम्यान, कोरोना काळात राज ठाकरे यांनी कधीच मास्क लावला नाही. पत्रकारांनी राज यांनी मास्त का लावला नाही? असा प्रश्न विचारला असता, ‘मी मास्क लावतच नाही तुम्हालाही सांगतो.’ असं राज ठाकरे यांनी उत्तर दिलं.