नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर
राजकारण

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर

मुंबई : हे सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते असा गौफ्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणेंना खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे राणे साहेब ! असे पाटील यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पाटील म्हणाले, ‘राणे साहेबांची भाजपच्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल. माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले.

काय म्हणाले होते नारायण राणे?
महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा दावा राणे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला होता. जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. या टीकेला राणेंनी उत्तर दिले होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार असल्याचेहील त्यांनी म्हटले होते.