राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अडचणीत; भाजप नेत्यावर हल्लाप्रकरणामुळे गुन्हा दाखल
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अडचणीत; भाजप नेत्यावर हल्लाप्रकरणामुळे गुन्हा दाखल

 

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माजलगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके अडचणीत आले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत भाजप नेते अशोक शेजूळ यांच्यावर तीन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस विभागाने आमदार प्रकाश सोळंके व त्यांच्या पत्नी मंगला सोळंके, व्यापारी रामेश्वर तवाणी व अन्य चार ते पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आणण्यात आल्याने आता त्याचे परिणाम विधिमंडळावरही होण्याची शक्यता आहे.

अशोक शेजूळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके आणि व्यापारी रामेश्वर तवाणी यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

भाजपचे नेते अशोकराव शेजूळ यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी माजलगाव शहरातील शाहोनगर येथे सायकलने काठ्या व धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या प्रक्रियेत त्यांच्या हातपायांना जबर मार लागला आणि एक पाय मोडला. त्याच्या डोक्यालाही मार लागला होता. त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके यांनी हा हल्ला केल्याचा दावा अशोक शेजूळ यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी फिर्यादही दिली.