राष्ट्रवादीकडून गृहमंत्री पदासाठी या नेत्याचे नाव निश्चित
राजकारण

राष्ट्रवादीकडून गृहमंत्री पदासाठी या नेत्याचे नाव निश्चित

मुंबई : अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. त्यामुळे नवी गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे राष्ट्रवादीकडून जवळपास निश्चित झाले आहे. खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे अशी राष्ट्रवादीच्या गोटात रंगली होती. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याआधीही गृहमंत्रिपद सांभाळले होते. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे अशी चर्चा राष्ट्रवादीत रंगली होती. न्यूज 18लोकमतने दिलीप वळसे पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचे म्हटले आहे.

दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला असल्याचे सांगण्यात येत आहे.