उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग; बसपाचे ९ आमदार करणार बंड
राजकारण

उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग; बसपाचे ९ आमदार करणार बंड

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुजन समाज पक्षाच्या ९ बंडखोर आमदारांनी आज (ता. १५) समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यामुळे हे ९ आमदार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंड करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. बसपाचे हे आमदार आज सकाळी ११ वाजता थेट लखनौ येथील सपच्या मुख्यालयात पोहचले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२०१७ मधील विधानसभा निवडणुकीत बसपाचे १९ आमदार विजयी झाले होते. मात्र नंतर आंबेडकरनगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बसपने आपली ही जागा गमावली होती. यानंतर रामवीर उपाध्याय आणि अनिल सिंह यांना बसप प्रमुख मायावती यांनी पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत, पक्षातून काढून टाकले होते. मागील वर्षी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान बसपाच्या सात आमदारांनी बसपा उमेदवारास समर्थन देण्यास नकार दिला होता व दावा केला होता की त्यांची कागदपत्र खोटी आहेत. एवढच नाही तर हे आमदार नंतर समाजवादी पार्टीच्या आमदाराचे समर्थक बनले होते. परिणामी त्यांची देखील मायावतींनी पक्षातून हकालपट्टी केली होती.

यानंतर मागील आठवड्यातच मायावतींनी पक्षातील वरिष्ठ आमदारांपैकी एक रामअचल राजभर आणि लालजी वर्मा यांना पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपात पक्षातून निलंबित केले होते. लालजी वर्मा १९९१ पासून बहुजन समाज पार्टीचं काम करत होते आणि रामअचल राजभर मायावतींच्या चारही कार्यकाळात मंत्री होते.