आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही; बीजेपीच्या सुवेंदू अधिकारी याचा निर्धार
राजकारण

आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही; बीजेपीच्या सुवेंदू अधिकारी याचा निर्धार

पश्चिम बंगाल : ”आता राज्यात कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही,” असा निर्धार नुकातच भाजपात गेलेले सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. अंतर्गत मतभेदातून गेल्या आठवड्यात सुवेंदु अधिकारी यांच्यासह काही नेत्यांनी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला हजेरी लावली. या प्रचारसभेत त्यांनी हा निर्धार केला. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये ते परिवहन मंत्री होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“गोपीबल्लभपूरचे दिलीप घोष आणि कांठीचे सुवेंदु अधिकारी आता एकत्र आले आहेत. त्यांची एकत्रित शक्ती खूप वाढली आहे. त्यामुळे आता तृणमूल सरकारला सत्ता सोडावीच लागेल. सध्या केवळ वादळ सुरू आहे. खऱ्या अर्थाने त्सुनामी पुढच्या वर्षी निवडणुका लागल्यावर सुरू होईल.” असा इशारा सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारला दिला. गुरूवारी कोंटाई आणि त्याआधी मिदनापूरच्या कांठीमध्ये अधिकारी यांनी प्रचारसभांना हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ममत बॅनर्जींच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

बंगाल विधानसभा निवडणुकांना काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) आणि भाजपा यांच्यातील राजकीय लढाई तीव्र झाली आहे. टीएमसीचे माजी नेते आणि नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या सुवेंदू अधिकारी अधिकारी यांनीही या लढाईत भाग घेतला असून राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले.

सुवेंदू अधिकारी 8 जानेवारीला नंदीग्राममध्ये सभा घेणार आहेत. तर ममता बॅनर्जी यांची ७ जानेवारीला सभा होणार आहे. याबाबत बोलताना अधिकारी म्हणाले की, ”ममता बॅनर्जी ७ जानेवारीला आपले नंदीग्राममध्ये स्वागत आहे. तुम्ही जे बोलला त्याला मी ८ जानेवारीला उत्तर देईल.” तसेच, ज्या सौगत रॉय यांनी माझ्याबर टीएमसी सोडून पळून गेल्याचा आरोप केला. ते रॉय १९९८ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात कॉंग्रेसचे उमेदवार होते.

दरम्यान, अधिकारी यांनी याआधीही त्यांनी ममतादीदींवर टीका केली होती. “ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. तृणमूल काँग्रेसमध्ये मला प्रचंड मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी ज्या नेत्यांनी मला त्रास दिला, ते आता मला, ‘पाठीत खंजीर खुपसणारा माणूस’ अशी उपमा देत आहेत. ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. त्या कुणाचाच विचार करत नाहीत. मी एक गोष्ट खात्रीने सांगतो की २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेसला जिंकता येणार नाही”, असं सुवेंदु अधिकारी पक्षप्रवेशाच्या वेळी म्हणाले होते.