योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर
राजकारण

योगी आदित्यनाथांकडून फिल्मसिटीची अधिकृत घोषणा; तर शिवसेनेलाही दिले उत्तर

मुंबई : ”उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं.” असे सांगत मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी आज अखेर उत्तरप्रदेशातील फिल्मसिटीची अधिकृत घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर ही घोषणा केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘ आशियातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवला आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन.”

यावेळी ठाकरे सरकार आणि शिवसेनेकडून झालेल्या टीकेवरही योगींनी उत्तर दिलं. कुणीही काहीही हिसकावून घेत नाहीयेत. सगळी खुली स्पर्धा आहे. कोण चांगल्या सुविधा देणार यावर सगळं निर्भर आहे. मुंबईतील फिल्म सिटी जशी आहे, तशीच राहणार आहे. तशीच काम करत राहणार. उत्तर प्रदेशातील फिल्म सिटी आपलं काम करेल. नव्या वातावरणानुसार, नव्या गरजांनुसार उत्तर प्रदेशात नवीन फिल्म सिटी उभी करणार आहोत,” असं योगी यांनी सांगितलं.

तसेच, उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं. अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.